Bhosari News : जागतिक महिला दिनानिमित्त सफाई कामगार महिलांचा सन्मान

एमपीसीन्यूज : जागतिक महिला दिनानिमित्त भोसरी येथील सफाई कामगार महिला व जेष्ठ नागरिकांचा श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सामाजिक कार्यकर्ते अक्षय दुनघव यांच्यावतीने लांडेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सामाजिक कार्यकर्ते राहुल काटे, साहेबराव साळवे, बळीराम गालफाडे, नवनाथ शिंदे, कृष्णा जाधव, कृष्णा उदागे, कृष्णा चव्हाण, तसेच महिला महिला कार्यकर्त्या संजिवनी सिरसाठ, आशा पवार, सुनिता हिरवटे, मनिषा सर्वगोड, रुक्मिणी कांबळे, रोशन वाघमारे, गोजर सरवदे, शकुंतला दुनघव, निला गव्हाणे, भिवराबाई गाडेकर, शितल मुंडे, बंटी जाधव, रेखा जाधव, कांचन कसबे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.