Bhosari News: दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी घेतली ऐतिहासिक लेण्यांची माहिती

एमपीसी न्यूज – गिफ्टएबल्ड फाउंडेशनतर्फे (Bhosari News) भोसरीतील पताशिबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्ट संचलित अंध शाळेतील 40 दृष्टीहीन विद्यार्थ्यांची लोणावळा जवळील भाजे या ऐतिहासिक लेण्यांना सहल घडवून आणली. या विद्यार्थ्यांना लेण्यांची माहिती देण्यात आली.

या सहलीची सुरुवात संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आले होते. या अंध शाळेतील विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हातील असून या शाळेत निवासी राहत असून शालेय शिक्षण घेत आहेत. या एकदिवशीय सहलीसाठी दृष्टीहीन विद्यार्थ्यांना गिफ्टएबल्ड संस्थेकडून बस सेवा आणि जेवणाची व्यवस्था डॉन बॉस्को या संस्थाकडून मोफत करण्यात आली होती.

Mumbai-Pune Highway : मुंबई-पुणे महामार्ग होतोय का मृत्यूचा सापळा? दहा महिन्यात झाले ‘इतके’ अपघात!

या सहलीच्या आयोजनासाठी गिफ्टएबल्ड फाउंडेशन संस्थेकडून (Bhosari News) स्वयंसेवक देखील मुलांना आवश्यक असलेल्या मदतीसाठी उपलब्ध करून दिले होते. शाळेने या सर्व उपक्रमाला आवश्यक प्रतिसाद देत आपला हिरीरीने सहभाग नोंदवला होता. या सहलीसाठी विद्यार्थी, तसेच शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग साळुंखे, संभाजी भांगरे, राजेंद्र वाडेकर, इतर शिक्षक वृंद व गिफ्टएबल्ड फाउंडेशन संस्थेकडून संस्थेचे सल्लागार हेमंत बापट, कार्यक्रम सहाय्यक बालाजी शिंदे उपस्थित होते. स्वयंसेवक म्हणून जयंत शिंदे,अनिकेत साळवे, पायल आडाळे व पल्लवी आडाळे यांनी योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.