Bhosari News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – पतीच्या त्रासाला कंटाळून लग्नाच्या (Bhosari News) अवघ्या चार महिन्यात पत्नीने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. ही घटना 4 एप्रिल 2023 रोजी भोसरीतील गणराज कॉलनी मध्ये घडली आहे.

याप्रकरणी मयत विवाहितेच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.28) फिर्याद दिली असून नवरा शुभम प्रकाश खिस्ती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC :  अनधिकृत होर्डिंग धारकांची याचिका निकाली; नियमांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीचा आरोपीशी 2 डिसेंबर 2022 रोजी विवाह झाला होती. मात्र आरोपीने लग्नानंतर पीडितेला विविध कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. मारहाण व मानसीक त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. अद्याप पतीला अटक झाली नसून भोसरी पोलीस पुढिल तपास करत (Bhosari News) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.