Bhosari News: विद्युत रोहित्राच्या स्फोट प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता विद्युत रोहित्राचा बिघाड झाला. महावितरणच्या लोकांनी तो विद्युत रोहित्र काढून दुसरा विद्युत रोहित्र बसवले. मात्र ते देखील नादुरुस्त होते. त्याचा स्फोट झाला

एमपीसी न्यूज – विद्युत रोहित्राचा स्फोट होऊन उकळते ऑइल दोन महिला आणि एका चार महिन्यांच्या बाळाच्या अंगावर सांडले. यामध्ये एका महिलेचा आणि बाळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी न घेतल्याबाबत तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणचे अधिकारी सुनील रोटे आणि अन्य संबंधित अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिलीप भगवान कोतवाल (वय 59, रा. राजवाडा, इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शारदा दिलीप कोतवाल (वय 51), शिवन्या काकडे (वय 4 महिने) यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. तर हर्षदा सचिन काकडे (वय 32) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोतवाल यांच्या घराजवळ असलेला विद्युत रोहित्र नादुरुस्त होता. त्याबाबत कोतवाल यांनी महावितरणच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना सांगितले होते. वारंवार सांगून देखील महावितरण कडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेण्यात आली नाही.

दि. 5 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता विद्युत रोहित्राचा बिघाड झाला. महावितरणच्या लोकांनी तो विद्युत रोहित्र काढून दुसरा विद्युत रोहित्र बसवले. मात्र ते देखील नादुरुस्त होते. त्याचा स्फोट झाला आणि त्यातून उकळते ऑइल बाहेर पडले. ते उकळते ऑइल जखमी आणि मयत महिलांच्या अंगावर पडले. यात चार महिन्यांच्या चिमुरडीचा देखील समावेश आहे.

याबाबत महावितरणच्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 304 (अ), 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.