Bhosari News : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी आणखी नऊ गुन्हे

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी शहरात गुन्हे दाखल होत आहेत. याप्रकरणी आता आणखी नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भोसरी पोलीस ठाण्यात चार, पिंपरी पोलीस ठाण्यात तीन आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दोन असे एकूण नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नईम पीर मोहम्मद (वय 36, रा. आदर्शनगर, दिघी), ज्योती तुकाराम डुंबरे (वय 35, रा.जय महाराष्ट्र चौक, भोसरी), धोंडीराम लक्ष्मण वंजारे (वय 55, रा. गुरुदत्त कॉलनी, भोसरी), कारभारी गुलाबराव पुंडे (वय 53, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंद्रकांत आनंदराव कदम (रा. वल्लभनगर, पिंपरी) यांच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात दोन तर अशोक मिश्रा आणि प्रेमप्रकाश अशोक मिश्रा (रा. कमला क्रोस बिल्डिंग, पिंपरी) यांच्या विरोधात एक गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

कोंडीराम माधव नागणे (वय 55, रा. मोशी), नितीन आबाजी जाधव (वय 45, रा. मोशी) या दोघांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आरोपींनी महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम केले. पालिकेने नोटीस देऊनही त्यांनी बेकायदेशीरपणे केलेले बांधकाम काढले नाही. याबाबत त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.