Bhosari News : भोसरी बीआरटी बसस्थानकात परिचारिका दिन उत्साहात 

एमपीसी न्यूज – भोसरी बीआरटी बसस्थानकात गुरुवारी (दि.13) परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भोसरी बीआरटी बसस्थानकातून म.न.पा. व पुणे स्टेशन येथे जाणाऱ्या सर्व हॉस्पिटल परिचारिका या कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देऊन परिचारिका दिन साजरा करण्यात आला. 

पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक डाॅ. राजेंद्र जगताप, सहव्यवस्थापकिय संचालक डॉ. चेतना केरूरे, वाहतुक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, मुख्यालय क्रमांक 2 पिंपरी मुख्य कार्यालयाचे समन्वयक अधिकारी संतोष माने व भोसरी आगाराचे डेपो व्यवस्थापक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी भोसरी BRT स्थानकाचे प्रमुख नियंत्रक कम चेकर काळुराम लांडगे, विजय आसादे, मच्छिंद्र आगरकर, दत्ता राऊत, वाहक राजेंद्र तपसे, चालक सुभाष भोसले, लक्ष्मण यादव यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

जागतीक परिचारिका दिन इ.स. 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे . फ्लाॅरेन्स नाइटिंगेल यांना अधुनिक शुश्रूषा संस्थापिका समजले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.