Bhosari News : अधिकारी फक्त ‘सह्याजीराव’ असतात, सर्वांच्या मार्गदर्शनाने शहराचा विकास घडतो – आयुक्त हार्डीकर

एमपीसी न्यूज – ‘अनसंग ‘वॉरीयर्स’ पुरस्काराने चांगल्या विचारांची देवाणघेवाण करण्याचे काम केले. अधिकारी हे फक्त ‘सह्याजीराव’ म्हणजे सही करण्याचे काम करतात. मात्र लोकप्रतिनिधी यांच्यासह सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि पाठपुराव्याने शहराचा विकास घडतो. प्रशासन आणि राजकारण यांनी सकारात्मक पद्धतीने घेतले, तर विकासाचा आलेख मांडता येतो. कोरोनाच्या काळात कोरोनामुक्त करण्यात यश मिळेल, असे मत महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी व्यक्त केले.

चिखली, मोशी, चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशन, अविरत श्रमदान, पिंपरी चिंचवड यांच्या वतीने कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. या वेळी आयुक्त हर्डीकर बोलत होते. या वेळी महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हार्डीकर म्हणाले, पिंपरीतील नागरिकांचा अभिमान वाटतो. कोरोनाच्या काळात भीतीचे वातावरण होते. मात्र एकजणही कामचुकार वागले नाहीत. या काळात अनेक अडचणी आल्या. आरोग्य विभागातल्या कर्मचाऱ्यांना पीपीई किट सुरुवातीला मिळाले नाही. सुरक्षा रक्षक मिळाले नाही. या काळात खुप वाईट गोष्टी पहिल्या. मात्र शहरातील नागरिकांच्या प्रेमामुळे कोरोनामुक्त शहर झाले. कोरोना पूर्ण गेला नाही.

_MPC_DIR_MPU_II

या प्रकारचे अनेक संकटे येतील. त्याला तोंड देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना वॉरीयर्सचा सन्मान हा माझा सन्मान आहे. निसर्गाशी पंगा घेणे चुकीचे आहे. त्यामुळे निसर्गाला जपत कार्यक्रम घ्यावे लागतील. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त हर्डीकर यांनी केले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, कोरोना काळात झोकुन देऊन काम करणा-या कोरोना योद्धे यांच्या विषयी मला आदर आहे. आयुक्तांनी देखील या काळात समतोल राखून काम केले. लोकांना आधार दिल्याचे आमदार लांडगे म्हणाले.

महापौर माई ढोरे म्हणाल्या, कोरोना योध्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम तो कौतुकास्पद आहे. शहरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण होते. सर्वत्र स्मशान शांतता होती. कोरोनामुक्त शहर करण्यासाठी अधिकारी ते सफाई कामगार सर्वच कामात होते. 25 लाख लोकांचा जीव महत्त्वाचा मानत 10 महिने लोकांच्या आरोग्याकडे लक्ष दिल्याचे ढोरे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1