Bhosari News: वीज समस्या निकालात काढण्यासाठी ‘ऑन दी स्पॉट’ भेट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील वीज समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन आणि महावितरण प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असतानाच आमदार महेश लांडगे यांनी ‘ऑन दी स्पॉट’ भेट देत समस्या निकालात काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘वीज समस्यामुक्त शहर’ अशी शहराची ओळख व्हावी, असा संकल्प करण्यात आला आहे.

महावितरण कार्यकारी अभियंता राहुल गवारे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी, सहायक अभियंता यांच्या उपस्थितीत पॉवर हाउस, बालाजीनगर येथे बैठक घेण्यात आली. यावेळी भोसरी मतदार संघातील धोकादायक पोल हटवणे, ट्रान्सफार्मर शिफ्ट करणे, मिनी डीपी बॉक्स शिफ्ट करणे, ट्रान्सफार्मर कपॅसिटी वाढवणे, नवीन ट्रान्सफार्मर सारखे अनेक प्रस्ताव डीपीडीसी योजनेंतर्गत तयार करुन सादरीकरण करण्यात आले.

परिवर्तन हेल्पलाईन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महावितरण संदर्भात अनेक समस्या माझ्यापर्यंत देत असतात. मात्र, प्रशासनाकडून त्याला योग्य प्रतिसाद दिला जात नाही. महाविरण प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उद्योजक, व्यापारी, नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांबाबत तात्काळ कार्यवाही करणे गरजेचे आहे. परिवर्तन हेल्पलाईन आणि सोशल मीडियातून आलेल्या तक्रारींचे निराकरण होणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी. तक्रारी आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने नागरिकांशी संवाद वाढवला पाहिजे, अशी सूचनाही आमदार लांडगे यांनी दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून महावितरण प्रशासनाच्या कामातील ढिसाळपणा, कोविड परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी यामुळे शहरातील वीज सेवेवर परिणाम झाला होता. विद्यार्थी, गृहिणी यांच्यासह वर्क फ्रॉम होम करणारे कर्मचारी, आयटी क्षेत्रातील कामगार यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत होता. याबाबत तात्काळ लक्ष घालून कार्यवाही करावी. तसेच, पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक, व्यापारी आणि नागरिकांची वीज समस्यांमधून सुटका करावी, अशी मागणी आमदार लांडगे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना पावसाळी अधिवेशनात निवेदन दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.