Bhosari News: कंपनीत काम सांगितले म्हणून एकाला जबर मारहाण

9 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पंकज यांनी आरोपी गणेशला काम सांगितले. या रागातून गणेश याने पंकज यांच्या डोक्यात ब्रासच्या जॉबने मारून गंभीर जखमी केले.

एमपीसी न्यूज – काम सांगितल्याच्या रागातून कंपनीतील एका कामगाराने दुस-याला ब्रासच्या जॉबने मारहाण करून जखमी केले. ही घटना 9 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता मावेन टूल्स अँड अ‍ॅक्नॉलॉजिस या कंपनीत घडली.

पंकज मधुकर आग्रे (वय 33, रा. च-होली खुर्द, ता. खेड) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश बाबुराव साने (वय 35, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज आणि आरोपी गणेश हे दोघे एमआयडीसी भोसरी येथील मावेन टूल्स अँड अ‍ॅक्नॉलॉजिस या कंपनीत काम करतात.

9 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास पंकज यांनी आरोपी गणेशला काम सांगितले. या रागातून गणेश याने पंकज यांच्या डोक्यात ब्रासच्या जॉबने मारून गंभीर जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.