Bhosari News : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘स्वप्नातील भारत’ विषयावर खुली निबंध स्पर्धा

एमपीसी न्यूज – साई कला आविष्कार नाट्य संस्थेच्या वतीने नि:शुल्क (Bhosari News)  खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या निबंध स्पर्धेत शालीय विद्यार्थी वर्ग,काॅलेजयुवक वर्ग,काॅलेज प्राध्यापक व सर्व स्तरातील नागरिकांना या स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

निबंधाचा विषय हा “भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत ….” असून  शब्दमर्यादा नसलेली ही  प्रथम भव्य निबंध स्पर्धा होत आहे. प्रत्येक सहभागींना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.विजेत्यांना समारंभपूर्वक स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

Pune News : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमेश भोंडेंचा कोचीमध्ये विशेष गौरव

आपल्या विचारांना खुले व्यासपीठ मिळावे.यासाठीच या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.कोणत्या गटात ही स्पर्धा होणार नाही.प्रथम सर्व स्पर्धेकातून फक्त प्रथम तीनच क्रमांक काढण्यात येणार आहे.जाणकार परीक्षकांकडून निबंधाची निवड ( Bhosari News) करण्यात येणार आहे.

तरी सर्वांनी आपला निबंध पुढील पत्त्यावर दि. 5 एप्रिल पर्यंत लेखी व पोष्टाने पाठवावे,असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आलेले आहे.

पत्ता

साई कला आविष्कार नाट्य संस्था

साई सदन,ए/3,महालक्ष्मी हाईटस,भोसरी,पुणे -411039.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.