Bhosari : विवाहितेची उपासमार केल्याप्रकरणी गुन्हा 

236

एमपीसी न्यूज – विवाहितेची उपासमार करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 5) या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

HB_POST_INPOST_R_A

या प्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती क्लॉडीएस जोसेफ धनम, सासू रोजमेरी जोसेफ धनम, नणंद जेनफीर पिल्ले, सप्रिना डिसोजा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे 2007 साली लग्न झाले आहे. दरम्यान, आरोपींनी संगनमताने महिलेस किरकोळ कारणाहून शिवीगाळ केली. तसेच वेळोवेळी उपाशी ठेऊन महिलेचा शाररीक व मानसिक छळ केला. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: