Bhosari News : सातवा वेतन आयोग मंजूर केल्याबद्दल ‘पीएमपी’ कामगारांच्या वतीने पदाधिकाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – सातवा वेतन आयोग मंजूर केल्यामुळे पीएमपीएमएल कामगारांच्या वतीने पीएमपीएमएल कामगार संघटनेतील पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांचाही सत्कार करण्यात आला.

‘पीएमपी’च्या संत तुकारामनगर आगार, नेहरूनगर, पिंपरी याठिकाणी सोमवारी (दि.1) हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समीतीचे सभापती संतोष लोंढे, पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार, भोसरी बीआरटी बसस्थानक प्रमुख काळुराम लांडगे, मिलिंद शेवाळे, शिलरत्न बाणे, जनार्दन घुले, हेमंत जोशी, विष्णू रायकर, जयसिंग यादव, संजय गायकवाड, राधाकृष्ण नायर, राजू बोरकर, दिलीप गायकवाड तसेच आगारातील चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचारी उपस्थित होते.

पिंपरी मुख्यालय क्रमांक दोनचे समन्वयक अधिकारी तथा नेहरूनगर आगार व्यवस्थाक संतोष माने व आगार अभियंता राजकुमार माने यांच्या हस्ते पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे व पीएमपीएमएलचे संचालक शंकर पवार यांना पुणेरी पगडी व संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. भोसरी आगार व्यवस्थापक रमेश चव्हाण व गणेश कवठेकर यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.सूत्रसंचालन शंकर काळभोर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.