Bhosari news: भोसरी येथे उद्या ‘प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ पुरस्कार वितरण सोहळा

एमपीसी न्यूज – कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य अन् सुरक्षिततेसाठी लढणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील प्रातिनिधिक स्वरुपात 25 कोरोना योद्धांचा गौरव केला जाणार आहे.

चिखली- मोशी- चऱ्होली हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने ‘अनसंग वॉरिअर्स, प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’ या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात उद्या (शनिवारी) सांयकाळी 5 वाजता हा सन्मान व पुरस्कार वितरण सोहळा होईल.

महापौर उषा ढोरे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फेडरेशनचे सचिव संजीवन सांगळे यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.