Bhosari News : ‘मॉर्निंग वॉक’च्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या 70 नागरीकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एक जूनपर्यंत कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहेत. अशात मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 70 नागरिकांवर भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉकच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्या 70 नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पीसीएनडीटीए सर्कल, मोशी प्राधिकरण, मोशी या परिसरात हे नागरिक विनाकारण बाहेर फिरताना पोलिसांना आढळून आले.

या सर्वांना एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात आणून त्यांना कोरोना विषाणुचे गांभिर्य समजावून सांगितले. तसेच, त्यांच्याकडून 35 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व योग्य त्या सुचना देऊन त्यांना सोडून देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.