Bhosari News : ह्युमन राईट अधिकारी असल्याचे सांगून जेष्ठ नागरिकाकडून उकळली खंडणी

एमपीसी न्यूज – ह्युमन राईट अधिकारी असल्याचे सांगून ‘तुमच्या विरोधात एका महिलेने तक्रार केली आहे’, अशी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकाकडून रोख रक्कम घेतली. तसेच गुन्हे शाखेच्या अधिका-यांसोबत बोलून प्रकरण मिटविण्यासाठी आणखी 30 हजारांची मागणी केली. याप्रकरणी या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 25 ऑक्टोबर रोजी नाशिक फाटा येथे घडली.

इम्तियाज अहमद हुसेन (वय 63, रा. पुलगेट, पुणे) यांनी बुधवारी (दि. 19) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम सय्यद (वय 40), हबीब सय्यद (वय 37), हाजी गुलाम रसूल सय्यद (वय 60) आणि स्टॅम्प पेपर वरील नाव असलेली हसीना बशीर मुलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे घरी होते. त्यावेळी आरोपी सलीम सय्यद याने फोन करून त्यांना नाशिक फाटा येथील एका हॉटेलवर बोलावले. फिर्यादी तेथे आले असता तेथे सलीम सय्यद, हबीब सय्यद आणि हाजी गुलाम रसूल सय्यद हे तिघेजण होते. त्यापैकी आरोपी सलीम आणि हबीब यांनी आपली ओळख ह्युमन राईट अधिकारी असल्याचे सांगितले.

‘तुमच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली आहे’ असे आरोपींनी फिर्यादी यांना सांगितले. आरोपी सलीम याने फिर्यादी यांना घाबरून कारवाई करण्याची धमकी दिली. तसेच आरोपी अनोळखी महिले सोबत बोलणे करून फिर्यादी यांच्याकडून 13 हजार 500 रुपये रोख स्वरूपात घेतले. तसेच फिर्यादी यांना त्या महिलेने लिहून दिलेला शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर दिला.

त्यानंतर गुन्हे शाखेचे अधिकारी जाधव यांच्या सोबत फोनवर बोलून हे प्रकरण मिटवण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर फिर्यादी आणि त्यांचे गुरु हजरत मेहबूब मिया केदारी (रा. बीड) यांच्यावर कारवाई करू, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.