Bhosari News : दुरुस्तीसाठी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल उद्यापासून बंद

एमपीसी न्यूज – भोसरी, इंद्रायणीनगर येथील (Bhosari News) संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलातील सिंथेटिक ट्रॅक पूर्णपणे बदलण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्या (बुधवार) पासून क्रीडा संकुल बंद राहणार आहे. दुरुस्तीच्या कामाला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत संकुल बंद राहणार आहे. याबाबतची माहिती महापालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक अनिल जगताप यांनी दिली.

महापालिकेचे इंद्रायणीनगर येथे संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल आहे. या संकुलात शहराच्या विविध भागातील मुले सरावासाठी येतात. संकुलातील सिथेंटकचे पूर्वीचे ट्रॅक खराब झाले आहेत. त्याच्या पट्ट्या तुटल्या आहेत. त्यामुळे सिंथेटिक ट्रॅक पूर्णपणे बदलण्यात येणार आहेत.

Chinchwad Bye-Election : पहिल्याच दिवशी 20 उमेदवारी अर्जांची विक्री; ‘यांनी’ नेले अर्ज

लॉन टेनिसही नादुरुस्त झाले आहे. त्याचीही दुरुस्ती करण्यात येणार (Bhosari News) आहे. संकुलातील ऑनलाईन बुकींग बंद केले आहे. दुरुस्तीच्या कामासाठी उद्यापासून संकुल पूर्णपणे बंद राहणार आहे. महापालिकेच्या क्रीडा स्थापत्य विभागाच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे.

सिंथेटिक ट्रॅक बदलण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे पुढील तीन महिने संकुल बंद राहणार आहे. तीन महिने खेळाडुंना तिथे सराव करता येणार नाही.

400 मीटर अंतराचा सिथेटिंकचा ट्रॅक

शहरातील अ‍ॅथलेटिक्स खेळाडू व प्रशिक्षकांच्या मागणीनुसार पालिकेने इंद्रायणीनगर येथे सिथेटिंकच्या ट्रॅक (कृत्रिम धावमार्ग) तयार केला आहे. तो 400 मीटर अंतराचा आहे. त्यावर 8 लेन (मार्गिका) आहेत. त्यावरून धावण्याचा सराव केला जातो. तसेच, मैदानात लांब उडी, उंच उडी, तिहेरी उडी, बाबू उडी, थाळी फेक, गोळा फेक, हातोडा फेक या क्रीडा प्रकाराचा सराव केला जातो. सकाळ व संध्याकाळी अनेक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी येथे नियमितपणे सराव करतात. तसेच, शहर, जिल्हा व राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन केले जाते.

सिथेटींक ट्रॅकला 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे तो अनेक ठिकाणी फाटला आहे. तसेच, काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात ट्रॅकवर पाणी साचले. मैदानात मोठ्या प्रमाणात गवत उगवल्याने गैरसोय होते. सराव करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे क्रीडा विभागाने खराब झालेला सिथेटिंक ट्रॅक काढून नवीन ट्रॅक टाकण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी किमान तीन महिने मैदान सरावासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. इतक्या कालावधीसाठी मैदान बंद ठेवल्याने सराव करता येणार नसल्याने खेळाडू, प्रशिक्षक व पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.