Bhosari News : राष्ट्रवादी युवक शहर उपाध्यक्षपदी सौरभ फुगे यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार भोसरी येथील सौरभ जंगलराव फुगे यांची पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी सौरभ फुगे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक अवघ्या एक वर्षावर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या संघटनात्मक बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. पक्षात मोठ्या प्रमाणात युवा नेतृत्वाला वाव दिला जात आहे.

सौरभ फुगे यांचा युवा वर्गात दांडगा जनसंपर्क असल्यामुळे पक्षाने त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदाची नवीन जबाबदारी दिली आहे. पवना सहकारी बँकेचे संचालक शामराव फुगे यांचे ते पुतणे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.