_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Bhosari Vaccination News : सावित्रीबाई फुले शाळेतील लसीकरण केंद्रावर वशिलेबाजी ?; रांगेत नसलेल्या 45 वर्षांपुढील नागरिकांना टोकन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 45 वर्षांपुढील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देताना वशिलेबाजी केली जात आहे. दुसऱ्या डोससाठी प्रथम येणाऱ्याला प्राधान्य असताना भोसरीतील सावित्रीबाई फुले शाळा लसीकरण केंद्रावर रांगेत नसलेल्या नागरिकांना आज (शुक्रवारी) टोकन दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. लसीकरण दहा वाजता सुरू होत असताना प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी आठ वाजताच रजिस्टरवर नागरिकांची नोंदणी करून टोकन संपल्याचे जाहिर केल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सध्या बंद आहे. केवळ 45 पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना शहरातील दहा केंद्रांवर लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. त्यानुसार भोसरीतील सावित्रीबाई फुले शाळा लसीकरण केंद्रावर 45 वर्षापेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना ‘कोव्हॅक्सीन’चा दुसरा डोस आज (शुक्रवारी) देण्यात येणार होता.

दुसऱ्या डोससाठी नागरिक लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. लसीकरण सुरू होण्याची वेळ सकाळी दहाची आहे. दुसऱ्या डोससाठी नोंदणी करावी लागत नाही. जो पहिल्यांदा येईल, त्याला प्राधान्याने लस दिली जाते.

_MPC_DIR_MPU_II

पहिल्यांदा आलेल्या नागरिकांना टोकन दिले जाते. त्यानुसार लसीकरण केले जाते. पण, दहा वाजता लसीकरण असताना आज आठ वाजताच प्रशासनाने उपस्थित नसलेल्या नागरिकांची नोंदणी केली. रांगेत नसलेल्या लोकांची नाव नोंदणी करण्यात आली. तसेच आज त्यांनाच लस मिळणार असल्याचे सांगितले. टोकनही वाटप केले नाही.

दहा वाजता लसीकरण सुरू होण्याची वेळ असताना आठच्या आतच टोकन संपल्याचे जाहीर केले. सकाळी आठ वाजल्यापासून रांगेत थांबलेल्या नागरिकांना परत पाठविले. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. वशिलेबाजीने टोकन देऊन दुसरा डोस दिला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या केंद्रावर ‘माननियां’च्या जवळच्या किंवा त्यांच्या व्यक्तींनी शिफारस केलेल्या (टोकन दिलेल्या) नागरिकांचे लसीकरण केले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला.

याबाबत भोसरी दवाखान्याच्या जेष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलजा भावसार म्हणाल्या, “असे काही घडले नाही. जेवढे नागरिक उपस्थित होते. त्या सर्वांना टोकन दिले. त्याउलट आम्ही नागरिकांना फोन करून दुसऱ्या डोसाठी बोलवत आहोत. काही नागरिकांचे मिस कम्युनिकेशन झाले असेल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.