Bhosari News: भोसरीत उभारणार मैलाशुद्धीकरण केंद्र; 11 कोटींचा खर्च मंजूर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भोसरी स.नं. 217 येथे आवश्यक क्षमतेचे मैला शुध्दीकरण केंद्र उभारले जाणार आहे. या केंद्रामुळे पंपीग स्टेशनसाठी लागणा-या वीज वापरामध्ये बचत होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. या प्रकल्पासाठी येणा-या 11 कोटी 67 लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली.

पुणे महानगर परिवहन महामंडळाला तुटीचे 40 कोटी रुपये, महापालिकेचे उर्वरित मैलाशुध्दीकरण केंद्रे आणि पंपीग स्टेशनसाठी एक्सप्रेस फिडरद्वारे अखंडीत वीजपुरवठा करणे तसेच रिंगमेनद्वारे जोडण्यासाठी आवश्यक अनुषंगीक कामे करण्यासाठी 7 कोटी 86 लाख रुपये, तर धावडेवस्तीमधील आरक्षण क्र. 432 विकसित केले जाणार आहे. यासाठी 12 कोटी 44 लाख रुपये खर्च होईल. च-होली येथील संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराज भेटीवर आधारित समुहशिल्पाच्या परिसरात संत ज्ञानेश्वर सृष्टी उभारण्यात येणार आहे. यासाठी 11 कोटी 94 लाख रुपये खर्चास मान्यता दिली.

_MPC_DIR_MPU_II

कुदळवाडी- जाधववाडी भागातून इंद्रायणी नदीस मिळणा-या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक कामे करुन 3 महिने प्रायोगिक तत्वावर चालविणे तसेच 5 वर्षाकरीता देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 11 कोटी 22 लाख रुपये, महापालिका हद्दीतील किवळे/रावेत, चिंचवड, पिंपरी वाघेरे, सांगवी, पिंपळे निलख, पिंपळे सौदागर, पिंपळेगुरव, भोसरी, दापोडी, आकुर्डी, निगडी येथील धारण केलेल्या जमिनीवरील अकृषिक बिनशेतसारा आकारणीची गावानिहाय थकबाकीची 1 कोटी 77 लाख 65 हजार रुपये शासनास अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.

पंडीत दिनदयाळ उपाध्याय क्रीडासंकुलाची स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी 21 लाख रुपये, भोसरी करसंकलन इमारती शेजारील मनपाच्या ताब्यातील जागेमध्ये बहुउद्देशीय हॉल बांधण्यासाठी 3 कोटी 23 लाख रुपये, से.नं.1,2,3 व इतर ठिकाणच्या रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यासाठी 35 लाख रुपये, से. नं.4,5,6 आणि इतर ठिकाणच्या रस्त्यांची हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्याकामी 35 लाख रुपये, नेहरुनगर पिंपरी येथील हिंदुस्थान एन्टीबायोटिक्स कंपनीच्या जागेतून नाला बांधण्यासाठी 1 कोटी 19 लाख रुपये खर्चास मान्यता देण्यात आली.

साई जीवन शाळे शेजारील मैदान विकसित करण्याकामी 5 कोटी 50 लाख रुपये, मुंबई पुणे महामार्गावरील तसेच बसस्थानकांवरील वाहतूक नियंत्रक दिव्यांची देखभाल, दुरुस्ती करणे व तद्अनुषंगिक कामे करण्यासाठी रक्कम रुपये 89 लाख खर्च होणार आहेत. या खर्चास देखील स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.