Bhosari News: भरधाव दुचाकीची पादचारी व्यक्तीला धडक

पिंपळे सौदागर-भोसरी उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी आला असता त्याच्या दुचाकीने जखमी प्रल्हाद राठोड यांना जोरात धडक दिली.

एमपीसी न्यूज – भरधाव जाणा-या दुचाकीने पादचारी व्यक्तीला जोरात धडक दिली. यामध्ये पादचारी व्यक्तीला गंभीर जखमी झाला आहे. त्या व्यक्तीच्या डोक्यात अंतर्गत गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.28) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर कासारवाडी येथे घडली.

प्रल्हाद हरिचंद्र राठोड (वय 42, रा. कासारवाडी) असे जखमी पादचारी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी नरेश बनारसी भाती (वय 26, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या (एमएच 14 बीबी 1226) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीस्वार शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजता पुणे-नाशिक महामार्गावरून जात होता. तो पिंपळे सौदागर-भोसरी उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी आला असता त्याच्या दुचाकीने जखमी प्रल्हाद राठोड यांना जोरात धडक दिली.

यामध्ये राठोड गंभीर जखमी झाले. त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले. तसेच डोक्याला अंतर्गत गंभीर दुखापत झाली. आरोपी दुचाकीस्वार अपघात करून पळून गेला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.