Bhosari news: राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – भविष्यामध्ये आदिवासी (Tribal) समाजाच्या प्रश्नाबाबत संघर्ष केला पाहिजे. गावोगावी यात्रांचे आयोजन करून समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. न्याय मिळविण्यासाठी आणि सरकारला जागे करण्यासाठी मोर्चे काढले पाहिजेत. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे  (Government Rhinoceros skin) असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केली.

भोसरी येथे आयोजित भाजप आयोजित अनुसूचित जमाती मोर्चाच्या ( Bjp Scheduled Tribe Morcha ) महामेळाव्यात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र सोडले.

पाटील म्हणाले, तुम्ही आंदोलन (Agitation) केल्याशिवाय हे सरकार कोणतीही गोष्ट मान्य करणार नाही. कोरोनाच्या काळात वाढीव वीजबिलाबाबत मोठे आंदोलन करावे लागले हे एक उदाहण आहे. सरकारी योजनांच्या बाबतीत मोठा गोंधळ सुरू आहे. आदिवासी बांधवांच्या माध्यमातून एका ट्रस्टची निर्मिती करणे आवश्‍यक आहे. त्यामधून आदिवासी मुलींच्या आरोग्याची आणि शिक्षणाची जबाबदारी उचलता येईल.

भाजप सरकारच्या काळात दोन योजना आदिवासी बांधवांसाठी महत्त्वाच्या केल्या. मात्र, त्या योजना आता बंद होत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना शहरातील मोठ्या शाळांमध्ये प्रवेश मिळाव यासाठी योजना सुरू केली. मात्र, आताच्या सरकारच्या काळात ती योजना क्षीण होत चालली आहे.

दुसरी योजना म्हणजे जमीनीचे पट्टे आदिवासी बांधवाना मिळणे. याबाबत कायदा झाला होता. सध्या उपलब्धी काहीच नाही. त्याबाबात जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून वनपट्टे आदिवासी बांधवाना दिले. सद्यस्थितीत आदिवासी बांधवांच्या योजनेकडे महाविकास आघाडीचे सरकार (mahavikas Aaghadi Government) दुर्लक्ष करत असल्याच आरोप पाटील यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.