Bhosari News : ‘मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार’ ॲड. जया उभे यांना जाहीर

एमपीसीन्यूज : सरपंच सेवा संघाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार’ पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या ॲड. जया बाळकृष्ण उभे यांना जाहीर करण्यात आला आहे.

संस्थेचे संस्थापक बाळासाहेब पावसे संगमनेर यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या ६ जानेवारीला दुपारी एक वाजता शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार आदी ममान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ॲड. जया उभे या पिंपरी चिंचवड शहर परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. विशेषतः अनाथ आणि निराधार मुलांसाठी करीत असलेल्या कार्यसाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.