Bhosari crime News : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पादचाऱ्याचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – भोसरी येथील स्पाईन रोडने निघालेल्या पादचाऱ्याचा मोबाईल दुचाकीवरील तीन अज्ञात इसमांनी हिसकावून चोरून नेल्याची घटना 26 नोव्हेंबर रोजी घडली.

याप्रकरणी संदीप रघूनाथ पांगरकर (वय 35, रा. जय गणेश साम्राज्य, स्पाईन रस्ता, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील तीन अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पांगरकर हे स्पाईन रस्त्याने मातेरे हाऊस रस्त्याकडे पायी चालले होते. त्यावेळी मागून आलेल्य़ा दुचावरील तीन जणांनी त्यांच्या हातातील आठ हजार रुपये किमीतीचा मोबाईल हिसकावून चोरून नेला.

एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.