Bhosari News : गर्भपात करत महिलेला व तिच्या मुलांना दिली जिवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेला (Bhosari News) गर्भवती केले. पुढे गर्भपात करण्यास भाग पाडून महिलेला व तिच्या मुलांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार 29 जून 2015 ते 29 नोव्हेंबर 2022 या कालावधीत भोसरी येथे घडला आहे.

महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून करण ओमप्रकाश राजपूत (रा.भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Pimpri News: म्युनिसीपल ई- क्लासरूम प्रकल्पांतर्गंत शिक्षकांनी घेतले तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला आरोपीने (Bhosari News) लग्नाचे आमिष दाखवले, तसेच तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवत तिला पुढे गर्भपातासाठी भाग पाडले. यावेळी पीडितेने माझी फसवणूक का करतो? असे आरोपीला विचारले असता आरोपीने फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिला व तिच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.