Bhosari News: युवक काँग्रेसचे पुस्तक वाटपाद्वारे शिवरायांना वंदन

एमपीसी न्यूज – हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने भोसरी लांडेवाडी येथील शिवस्मारका जवळ शिवप्रेमींना ‘रयतेचा राजा’ या पॉकेट पुस्तिकेचे वाटप केले.

याबाबत माहीती देताना उपक्रमाचे आयोजक व युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, “शिवजयंती निमित्त शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाच्या आठवणींना उजाळा मिळावा, त्यातूनच आजच्या युवा पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने युवक काँग्रेसच्या वतीने आज या पॉकेट पुस्तिकेचे वाटप करून शिवरायांना कार्यरूपी अभिवादन केले.

या छोटेखानी पॉकेट पुस्तिकेत चित्र संदर्भासहित शिवचरित्र दर्शविले आहे. यातून विशेषत: लहानांना सुलभ पध्दतीने शिवचरित्र समजेल. वाचनांची आवड निर्माण होऊन त्यांना इतिहासाची जाणीव करून देता येईल. आजच्या माहीती तंत्रज्ञानाच्या या विश्वात आपला इतिहास विसरत चालेल्या पिढीला शिवचरित्रातून योग्य दिशा व आत्मबळ मिळेल’, असे बनसोडे यांनी सांगितले.

या ठिकाणी शिवरायांना वंदन करायला आलेल्या बालगटांना, युवक समूह व महीला गटांना या पुस्तिकांचे वाटप करण्यात आले.

पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सौरभ शिंदे, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस राहूल काळभोर, शंकर ढोरे, अलोक लाड, विरेंद्र गायकवाड, मिलिंद बनसोडे व प्रविण जाधव, राकेश सपांगे, आकाश जाधव आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.