Bhosari News : पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज – विनापरवाना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांना शस्त्र विरोधी पथकाने अटक केली आहे. स्पाईन रोड, संत नगर चौक, भोसरी येथे सोमवारी (दि.21) सकाळी 10.30 वा ही कारवाई करण्यात आली. आरोपीने कारच्या डिकीत पिस्टल ठेवले होते.

अतुल दिलीप भागवत (वय 37, रा. बिजली नगर, चिंचवड) आणि सुनील अनंता पिसाळ (वय 36, रा. भोसरी, मुळगाव रायगड) असे अटक ओरोपींची नावे आहेत. पोलीस शिपाई प्रवीण मुळूक यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपींनी विनापरवाना एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काडतुसे जवळ बाळगली होती. चाकचाकीच्या (एमएच 12 जेयु 8339) डिकीत त्यांनी पिस्टल व काडतुसे लपवून ठेवली होती. पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले असून मुद्देमाल जप्त केला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.