Bhosari News : बालनगरी कोरोना सेंटर चालविण्यासाठी रुबी अल केअरला दोन कोटी

एमपीसी न्यूज – महापालिकेचे भोसरी बालनगरी येथील कोरोना केअर सेंटर चालविण्याचे काम रुबी अल केअर सर्व्हिसेस यांना देण्यात आले आहे. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतरही हे कोरोना केअर सेंटर सुरू ठेवले होते. या संस्थेस 3 फेब्रुवारी ते 2 मे 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सध्या कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने रुबी अलकेअर सर्व्हिसेस यांना पुढील तीन महिन्यांसाठी 500 बेडच्या क्षमतेप्रमाणे मुदतवाढ दिली आहे. 3 मे ते 2 जुलै 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात आली.

परंतु, कोरोना रुग्णसंख्या आणखी कमी होऊ लागल्याने 1 जूनपासून बेडसंख्या 500 ऐवजी 300 करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार रुबी अलकेअर सर्व्हिसेसला एकूण 2 कोटी 4 लाख 85 हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.