Bhosari News : डीपीच्या स्फोटात चार महिन्यांच्या बालकासह दोन महिला भाजल्या

भोसरी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

एमपीसी न्यूज – भोसरी येथील इंद्रायणीनगरच्या राधाकृष्ण चौकात आज, शनिवारी दुपारी दिडच्या सुमारास डीपीचा स्फोट झाला व डीपीने पेट घेतला. या आगीत शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेडलाही आग लागली व त्या ठिकाणी असलेल्या चार महिन्याच्या बालकासह दोन महिला जखमी झाल्या. भोसरी अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

हर्षदा काकडे ( वय 30), शारदा कोतवाल ( वय 51) व शिवानी नावाचे चार महिन्यांचे बाळ या आगीत भाजले असल्याची माहिती आहे. या सर्वांना उपचारासाठी तात्काळ भोसरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भोसरी अग्निशमन दलाच्या वतीने देण्यात आलेली माहिती अशी, इंद्रायणी नगरच्या राधाकृष्ण चौकात दुपारी दीडच्या सुमारास विद्युत डीपीचा स्फोट झाला.

यामध्ये डीपीला आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पंचवीस मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.