Bhosari News: ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पाच ठिकाणी लसीकरण केंद्र

प्रभाग समिती अध्यक्ष विकास डोळस यांच्या प्रयत्नांना यश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत प्रभाग समिती अध्यक्ष विकास डोळस यांच्या पाठपुराव्याने पाच ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरु झाले आहेत. नागरिकांनी नावनोंदणी करुन लसीकरण घ्यावे असे, आवाहन सभापती डोळस यांनी केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांना प्राधान्याने लस दिल्यानंतर कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मार्चपासून सुरु झाला आहे.

_MPC_DIR_MPU_II

या टप्प्यात 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत आहे.

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सभापती विकास डोळस यांच्या पाठपुराव्याने पाच ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरु झाले आहेत. दिघी महापालिका शाळा, च-होलीतील महापालिकेची शाळा, मोशीतील महापालिका शाळा, लांडेवाडीतील सावित्रीबाई फुले महापालिका शाळा आणि नवीन भोसरी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरु आहे.

कोरोनाची लस पूर्णपणे सुरक्षित आहे. 45 ते 59 वयोगटातील व्याधीग्रस्त व्यक्ती (को-मॉर्बिड) आणि 60 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणासाठी नावनोंदणी करावी. लसी टोचवून घ्यावी,  असे आवाहन सभापती विकास डोळस यांनी नागरिकांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.