Bhosari News : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करत बनवला व्हिडीओ

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तसेच अत्याचाराचा व्हिडिओ तयार केला. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मार्च 2021 ते 2 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये रोशन गार्डन, अंकुशराव लांडगे नाट्यगृह समोरील पार्किंग, तसेच डुडुळगाव येथील लॉजमध्ये वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी घडली आहे.

कमलेश दत्तात्रय वाळुंज (वय 30, रा. स्पाईन रोड, भोसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका अल्पवयीन मुलीने मंगळवारी (दि. 4) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कमलेश वाळुंज याने फिर्यादी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध केले. 11 डिसेंबर रोजी डुडुळगाव येथील एका लॉजवर फिर्यादीला नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी आरोपीने शारीरिक संबंधाचे व्हिडीओ काढून अल्पवयीन मुलीला पाठवले. ते व्हिडीओ इतरांना पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर 2 जानेवारी रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास आरोपीने किरकोळ कारणावरून वाद घालून फिर्यादीची आई व फिर्यादीचा मामेभाऊ यांना हाताने मारहाण करून पाहून घेण्याची धमकी दिली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.