Bhosari News : महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी संघर्ष करणार : भाग्यश्री पवार

स्वाभिमानी संघर्ष सेना महिला आघाडीची जिल्हा कार्यकारीणी जाहीर; असंख्य महिलांचा संघटनेत प्रवेश

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज : समाजात महिलांचे अनेक प्रश्न असून त्यांना न्यायासाठी कायम झगडावे लागत आहे. दुर्दैवाने महिलांच्या प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केले जाते. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या विविध समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी संघर्ष सेना सदैव तत्पर आहे. या संघटनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणावर भर दिला जातो. राजकारण विरहित असलेली ही संघटना महिलांच्या उत्कर्षसाठी प्रयत्नशील आहे.  महिलांवरील अन्याय रोखण्यासाठी संघर्ष केला जाईल. तसेच त्यांना त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून केले जाईल, अशी ग्वाही स्वाभिमानी संघर्ष सेना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी दिली.

स्वाभिमानी संघर्ष सेनेची पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवड कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, नूतन महिला पदाधिकाऱ्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सांगळे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा भाग्यश्री पवार व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी असंख्य महिलांनी स्वाभिमानी संघर्ष सेनेत प्रवेश केला.

भोसरी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सांगळे, प्रदेश उपाध्यक्ष वजिद शेख, प्रदेश सरचिटणीस वैज्जनाथ गुट्टे, पत्रकार राजकुमार रेड्डी, संघटनेचे कायदा सल्लगार ॲड. आघाव, आदी मान्यवरांनी महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सांगळे, रेड्डी व गुट्टे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत संघटनेच्या ध्येय धोरणांची माहिती दिली. मावळ तालुका युवा सेनेचे विशाल दांगट, अभिजित भोसले उपस्थित होते.

कार्यकारिणीत मनिषा करमारे ( पुणे जिल्हा संपर्क प्रमुख), निलम हुले ( पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा) अमृता जगदाळे (भोसरी अध्यक्षा), उज्ज्वला कुंभार( दिघी अध्यक्षा), मनिषा ढोणे (आळंदी शहराध्यक्षा), सतिश जरे ( मोशी अध्यक्ष), तेजश्री गवते ( चाकण शहराध्यक्षा), प्रिया लोंढे ( तळेगाव शहराध्यक्षा), घन:शाम राऊत (वाकड अध्यक्ष), अरुण काळे ( राजगुरुनगर शहराध्यक्षा ) यांचा समावेश आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.