Bhosari News: मुलीने लग्नास नकार दिला म्हणून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

भरतने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये आपल्या आत्महत्येस उषा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी उषा विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

एमपीसी न्यूज – लग्न जमल्यानंतर मुलीने लग्नासाठी नकार दिल्याच्या कारणावरून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे घडली. याबाबत नकार देणा-या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उषा बाळू सरोगदे (वय 23, रा. खडकुंबे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी तिला अटक केली केली आहे. भरत कृष्णा तळपे (वय 26, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भरतचे वडील कृष्णा केशव तळपे (वय 55) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा भरत आणि आरोपी तरुणी उषा यांचा विवाह ठरला होता. 21 जुलै ते 31 जुलै या कालावधीत उषा हिने भरतला किरकोळ कारणांवरून लग्न करण्यास नकार दिला. तसेच भरतला मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. 31 जुलै रोजी भरतने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

भरतने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. त्यामध्ये आपल्या आत्महत्येस उषा जबाबदार असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी उषा विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.