Bhosari News : तरुणावर कोयत्याने वार तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – पार्किंगवरून झालेल्या वादाबाबत बोलण्यासाठी केलेल्या एका तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी दि. 25 रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.

मोहम्मद रब्बनी जमालुद्दिन शेख वय 27, रा. कासारवाडी असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी या प्रकरणी रविवारी दि. 26 भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दाउद पटेल रा. थेरगाव, मुस्तफा पटेल, इलियास पटेल दोघे रा. कासारवाडी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई आणि वहिनी यांचे दुचाकी पार्किंग करण्यावरून दोन महिलांशी भांडण झाले. त्याबाबत बोलण्यासाठी फिर्यादी आरोपींकडे गेले. आरोपी दाऊद आणि मुस्तफा यांनी आपसात संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ केली. आरोपी दाऊद ने फिर्यादी यांच्या कपाळावर आणि हनुवटीवर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. अन्य दोन आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक पासलकर तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.