Bhosari News: कार विक्रीच्या बहाण्याने तरुणाची चार लाखांची फसवणूक

त्यातील चार लाख रुपये फिर्यादी यांनी आरोपीला ऑनलाइन आयएमपीएस आणि गुगल पे द्वारे दिले. त्यानंतर गाडीची कागदपत्रे देतो. असे सांगत आरोपीने फिर्यादी कपिल यांचा विश्वास संपादन केला.

एमपीसी न्यूज – कार विक्रीच्या बहाण्याने एका तरुणाची चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित ज्ञानदेव पाटील (वय 40, रा. बिबवेवाडी, पुणे. मूळ रा. संग्रामनगर, अकलूज. ता. माळशिरस. जि. सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कपिल ज्ञानचंद्र हासवाणी (वय 30, रा. पिंपळे सौदागर) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमित याने 2015 साली मॅग्मा फिनकॉर्प फायनान्स कंपनीकडून बीएमडब्ल्यू कार (एमएच 12 जेसी 9696) विकत घेतली होती. ती कार आरोपीने फिर्यादी यांना नोव्हेंबर 2019 मध्ये साडेआठ लाख रुपयांना विकण्याचे मान्य केले.

त्यातील चार लाख रुपये फिर्यादी यांनी आरोपीला ऑनलाइन आयएमपीएस आणि गुगल पे द्वारे दिले. त्यानंतर गाडीची कागदपत्रे देतो. असे सांगत आरोपीने फिर्यादी कपिल यांचा विश्वास संपादन केला.

17 फेब्रुवारी 2020 रोजी फिर्यादी यांच्याकडून कार घेतली आणि निघून गेला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना कार अथवा पैसे न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.