Bhosari : भोसरी मतदारसंघात ‘नोटा’ चौथ्या स्थानावर!

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभेचा निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना पुन्हा एकदा आमदार म्हणून भोसरीच्या जनतेने कौल दिला आहे. दुस-या स्थानावर विलास लांडे, तर तिस-या स्थानावर वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख आहेत. एकूण बारा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या उमेदवारांमध्ये ‘नोटा’चा पर्याय चौथ्या स्थानावर आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे 77 हजार 577 मतांनी विजयी झाले. महेश लांडगे यांना 1 लाख 59 हजार 305 तर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना 81 हजार 728 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे शाहनवाज शेख यांना 13 हजार 151 मते मिळाली. यानंतर चौथ्या स्थानावर ‘नोटा’ आहे. ‘नोटा’ला 3 हजार 630 मतदारांनी पसंती दिली आहे. वरीलपैकी कोणताही उमेदवार पसंत नसल्यास या पर्यायाचा उपयोग करता येतो.

उमेदवारांना मिळालेली मते –
महेश लांडगे (भाजप) – 1 लाख 59 हजार 305
विलास लांडे (अपक्ष) – 81 हजार 543
शाहनवाज शेख (वंचित बहुजन आघाडी) – 13 हजार 151
राजेंद्र पवार (बहुजन समाज पार्टी) – 1 हजार 859
विश्वास गजरमल (जनहित लोकशाही पार्टी) – 706
वहिदा शेख (समाजवादी पार्टी) – 611
ज्ञानेश्वर बोराटे (अपक्ष) – 604
छाया जगदाळे-सोळंके (अपक्ष) – 501
मारुती पवार (अपक्ष) – 384
भाऊसाहेब आडागळे (अपक्ष) – 300
हरेश डोळस (अपक्ष) – 243
‘नोटा’ – 3 हजार 630

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like