Bhosari: चिखली, भोसरी येथे दीड लाखांची घरफोडी!; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भोसरी आणि चिखली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या घरफोड्यांमध्ये दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरून नेला.

भोसरीतील घटनेप्रकरणी काळुराम बबन रणपिसे (वय 45, रा. रामनगरी हौसिंग सोसायटी, आळंदी रोड, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 14 फेब्रुवारी रोजी फिर्यादी रणपिसे यांच्या पत्नी नातेवाईकाच्या लग्नाला गेल्या होत्या. त्यामुळे घर कुलूप लावून बंद होते. चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील 59 हजार रूपये किमतीचे चार तोळे सोन्याचे दागिने आणि 15 हजाराची रोकड असा 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

तर, चिखलीतील घटनेप्रकरणी विजय गोपालसिंग पडीयार (वय 29, रा. राजे शिवाजीनगर, प्राधिकरण, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 12 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत फिर्यादी पडीयार याचे घर कुलूप लावून बंद होते.

चोरट्यांनी कुलूप तोडून घरातील शयनगृहामधील डेल कंपनीचा 8 हजाराचा लॅपटॉप, 30 हजार रूपये किमतीचे दोन तोळे सोन्याचे दागिने, एक हजाराचे चांदीचे दागिने आणि 32 हजाराची रोकड आणि तीन हजाराचे घरगुती कपडे असा 74 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.