Bhosari : पिस्टल बाळगणा-या एकाला अटक; गावठी पिस्टलसह एक जिवंत काडतूस जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीररित्या पिस्टल बाळगणा-या एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

राजकुमार गोकुळ घुटे (वय 19, रा. जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई समीर लक्ष्मण रासकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी रोड दापोडी येथे एक तरुण संशयितरित्या थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून राजकुमार याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी 25 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त करत राजकुमार याला अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.