Bhosari : विविध मागण्यांसाठी भोसरीत एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – सेवा ज्येष्ठतेनुसार शिक्षकांना पगार द्यावा, महिन्याचा पगार ऑनलाईन पध्दतीने मिळावा, प्रत्येक शिक्षकांची मान्यता जिल्हा परिषदेकडून घ्यावी आदी विविध मागण्यांसाठी भोसरी येथील सिद्धेश्‍वर शाळेतील शिक्षकांनी शाळेच्या प्रवेशद्वारावर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व लोककल्याण मजदूर युनियनचे अध्यक्ष अॅड. आर. बी. शरमाळे यांनी केले. यावेळी, डी. आर. लांडगे, मनिषा काशिद, सु. वा. दोरवे, अरुण काळे आदी उपस्थित होते.

अॅड. शरमाळे म्हणाले, सिद्धेश्‍वर या इंग्रजी माध्यमातील शाळेची स्थापना 1975 साली करण्यात आली. शाळेतील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन कायद्याच्या नियमाप्रमाणे दिले जात नाही. तसेच, शिक्षकांच्या पगारातून कपात करत असलेला भविष्य निर्वाह निधी (पीएफ) ची माहिती दिली जात नाही. प्रत्येक कर्मचाऱ्याचे सेवा पुस्तक वर्षानुवर्षे भरले जात नसून जिल्हा परिषदेकडून प्रत्येक शिक्षकाची मान्यता घेतली नाही. तसेच, शाळेत महिला तक्रार निवारण केंद्र उपलब्ध नाही. महिला शिक्षकांना नियमानुसार प्रसुती पगाराची रजा द्यावी. पगाराची पावती दिली जात नाही. याबाबत, शिक्षकांच्या मागण्यांचे पत्र संस्था व शिक्षणाधिकाऱ्यांनाही देऊनही कोणतीही कार्यवाही केली जात नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.