Bhosari : खासगी बसच्या धडकेत एकाचा मृत्यू; बसचालकाला अटक

ही घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सव्वासात वाजता नाशिक फाटा बस थांबा, कासारवाडी येथे घडली.

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असलेल्या एकाला खासगी बसने धडक दिली. त्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 18) सायंकाळी सव्वासात वाजता नाशिक फाटा बस थांबा, कासारवाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी बस चालकाला अटक केली आहे.

आनंद मंगलचंद राउत (वय 40, रा. चिंचवडगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आनंद यांचे नातेवाईक राहुल नरेंद्र रुखणे (वय 42, रा. पुणे) यांनी गुरुवारी (दि. 20) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी सुभाष श्रीधर गुंजाळ (वय 28, रा. मोहननगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आनंद हे मंगळवारी सायंकाळी सव्वा सात वाजता कासारवाडी येथील नाशिक फाटा बस थांब्याजवळून जात होते.

त्यावेळी गुंजाळ याच्या ताब्यातील भरधाव वेगात आलेल्या खासगी बसने (एमएच 12 / सीटी 0895) त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आनंद यांचा मृत्यू झाला.

आनंद यांचा अंत्यविधी केल्यानंतर गुरुवारी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बसचालक सुभाष गुंजाळ याला अटक केली आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.