BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : पीएमपीएमएल बस प्रवासात प्रवाशाची एक लाखाची रोकड चोरली

एमपीसी न्यूज – खराळवाडी ते दापोडी मार्गावरून पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाची एक लाख रुपयांची रोकड चोरली. ही घटना मंगळवारी (दि. 21) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

भगवान शंकर जाधव (वय 55, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे मंगळवारी सकाळी सव्वा अकरा ते साडे अकरा वाजताच्या दरम्यान पीएमपीएमएलच्या बसने खराळवाडी ते दापोडी असा प्रवास करीत होते.

त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like