Bhosari : तरुणीच्या घरात जाऊन विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा 

एमपीसी न्यूज – तरुणीच्या घरी येऊन तिचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना फुलेनगर झोपडपट्टी, भोसरी येथे मंगळवारी (दि. 19) रात्री दहा वाजताच्या सुमारास  घडली.

संतोष दत्तू क्षेत्रे (वय 34, रा. एमआयडीसी, भोसरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 20 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. 20) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलेनगर झोपडपट्टीत राहणारी ही तरुणी मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास जेवण झाल्यानंतर वरच्या खोलीत भांडी घासण्यासाठी गेली. तिने गँलरीतून बाहेर पाहिले असता एक जण तिच्याकडे टक लावून पाहत होता.

याबाबत तिने त्याला जाब विचारला असता आरोपी संतोष याने “मला तू खूप दिवसांपासून आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम आहे”, असे बोलला.

यामुळे तरुणीने खालच्या खोलीत येऊन घडलेला प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. त्यावेळी आरोपी त्यांच्या दारासमोर आला. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणत त्याने तरुणीचा हात पकडून तिचा विनयभंग केला.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.