Bhosari : किरकोळ वादातून एकाने मेडिकल चालकाच्या पाठीत खुपसली कात्री

एमपीसी न्यूज – वस्तू खरेदीच्या वेळी झालेल्या किरकोळ वादातून एकाने मेडिकल चालकाच्या पाठीत कात्री खुपसली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री सव्वाअकराच्या सुमारास राधानगरी, भोसरी येथे घडली.

ओगडराम नेनाराम चौधरी (वय 28, रा. राधानगरी, भोसरी) असे जखमी झालेल्या मेडिकल चालकाचे नाव आहे. त्यांनी याबाबत शनिवारी (दि. 19) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण राठोड (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यासह त्याच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपनिरीक्षक तलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चौधरी यांचे राधानगरी येथे ‘स्मार्ट केअर मेडिकल’ नावाने औषध विक्रीचे दुकान आहे.  शुक्रवारी रात्री आरोपी खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी आले. त्यावेळी चौधरी आणि त्यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक वाद सुरु झाला.

वाद वाढल्याने चिडलेल्या आरोपी राठोड याने शिवीगाळ करत चौधरी यांच्या पाठीत कात्री खुपसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.