Bhosari : गवळी माथ्यावर जुन्या भांडणातून एकावर गोळीबार

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना भोसरी येथील गवळी माथ्यावर घडली आहे. गोळीबार करणारा आणि ज्याच्यावर गोळीबार झाला, असे दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत. हा प्रकार आज, मंगळवारी (दि. 4) सकाळी अकराच्या सुमारास झाला.

नाना लांडगे असे गोळीबार करणा-याचे नाव आहे. तर, प्रशांत लांडगे यांच्यावर गोळीबार झाला आहे.

नाना आणि प्रशांत यांची जुनी भांडणे आहेत. सकाळी अकराच्या सुमारास भोसरीमधील गवळी माथा येथे नाना याने प्रशांत यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

नाना लांडगे यांच्यावर काही गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. चार ते पाच वर्ष तो तुरुंगात होता. सर्व गुन्ह्यातून सुटल्यामुळे तो बाहेर होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.