Bhosari : गैरसमजातून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

एमपीसी न्यूज – बोलत थांबलेले दोन तरुण एकमेकांशी भांडत असल्याचा गैरसमज करून तिस-या तरुणाने एकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 13) रात्री सव्वादहाच्या सुमारास कासारवाडी येथील वरून हॉटेलच्या मागे घडली.

विनेश सुरेश केल्लापण (वय 26, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शैबजसिराज कुरेशी (वय 21, रा. कासारवाडी), अमिन फिरोज खान (वय 20, मोमीनपुरा कॅम्प, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री विनेश आणि कुरेशी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ते दोघेजण कासारवाडी येथील वरुण हॉटेलच्या मागे बोलत थांबले होते. त्यावेळी अमिन तेथे आला. विनेश आणि कुरेशी यांच्यामध्ये भांडण सुरु असल्याचा अमिन याचा गैरसमज झाला. त्याने विनेश यांना चापट मारली. कुरेशी आणि अमिन हे दोघे मित्र आहेत. विनेश यांनी अमिनला मारल्याच्या रागातून कुरेशी आणि अमिन या दोघांनी मिळून विनेशला सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यामध्ये विनेश यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.