Bhosari : फोनवर बोलत थांबलेल्या व्यावसायिकाला दोघांनी लुटले

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून जात असताना फोन आला म्हणून रस्त्याच्या बाजूला थांबून बोलत असताना दोन अनोळखी चोरटयांनी व्यावसायिकाला लुटले. एक लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे एकच्या सुमारास एमआयडीसी भोसरी येथे फिलिप्स कंपनीसमोर घडली.

योहान आनंद हळ्ळी (वय 58, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योहान सोमवारी रात्री त्यांच्या भोसरी येथील शीमंत व्ही बालकी या मित्राकडे जेवणासाठी गेले होते. जेवण उरकून ते मोपेड दुचाकीवरून त्यांच्या संत तुकाराम नगर येथील घराकडे येत होते. भोसरी एमआयडीसी मधील फिलिप्स कंपनीसमोर आल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाचा फोन आला. त्यामुळे त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला लावून मुलासोबत फोनवर बोलत थांबले. त्यावेळी आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांचा मोबाईल फोन, सोन्याच्या दोन अंगठ्या आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 7 हजार 500 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.