Bhosari : मतदानाच्या रांगेत उभा असताना ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – मतदान करण्यासाठी गेलेल्या एका नागरिकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 21) सकाळी साडे नऊच्या सुमारास भोसरी शांतीनगर येथील महात्मा फुले शाळेतील मतदान केंद्रावर घडली.

अब्दुल रहीम नुरमोहम्मद शेख (वय 55, रा, बारामती) असे मृत्यू झालेल्या मतदाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांना चार महिन्यांपूर्वी घशाचा कॅन्सर झाला असून याबाबत उपचार सुरु होते. त्यांचे मतदान भोसरीत असल्याने सोमवारी सकाळी ते शांतीनगर येथील महात्मा फुले शाळेत मतदानासाठी आले होते. मतदान करण्यासाठी त्यांचा नंबर आला असता त्यांना घाम फुटला आणि छातीत दुखू लागले. त्यामुळे ते खुर्चीत बसले आणि तेथेच बेशुद्ध पडले. त्यांना पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या ओळखीच्या नागरिकांनी याबाबत नातेवाईकांना कळविले. शेख यांचा बारामतीमध्ये बेकरीचा व्यवसाय असून नवीन कामगारांना ते केकची डिझाईन शिकवितात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.