Bhosari : खिसेकापूला रंगेहाथ पकडल्यामुळे तिघांकडून एकाला मारहाण

एमपीसी न्यूज – आईस्क्रीम घेत असलेल्या एका व्यक्तीच्या मागच्या खिशाला एकाने हात लावला. यासाठी आईस्क्रीम घेणा-या व्यक्तीने त्याच्याकडे बघितले असता तिघांनी मिळून एकाला मारहाण केली. ही घटना दापोडी येथे शनिवारी (दि. 14) रात्री घडली.

याप्रकरणी धर्मेश माताफेर पाल (वय 35, रा. जयभीमनगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नटराज बाळकृष्ण स्वामी (वय 35, रा. भालेकरनगर, पिंपळे गुरव), तौफिक व अनोळखी व्यक्‍ती (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी धर्मेश विनियार्ड चर्चच्या बाजूला आइस्क्रीम घेण्यासाठी थांबले होते. त्यावेळी आरोपी स्वामी याने धर्मेश यांच्या पॅन्टला पाठीमागून हात लावला. स्वामी याने चोरीच्या उद्देशाने हात लावल्याचे धर्मेश यांना जाणवल्याने त्यांनी त्याच्याकडे मागे वळून बघितले. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करून धर्मेश यांना फायटर व पंचने मारहाण करून जखमी केले. यात डोक्याला व नाकाला गंभीर इजा झाली. भोसरी पोलिसांनी नटराज याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.