Bhosari : नाशिक फाट्याच्या उड्डाणपुलावरून उडी मारून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – उड्डाणपुलावरून उडी मारून तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि. 30) सायंकाळी सातच्या सुमारास नाशिकफाटा येथे घडली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणीने गुरुवारी सायंकाळी कासारवाडी येथील नाशिक फाट्यावरील उड्डाणपुलावरून उडी मारली. यावेळी चौकात वाहतूक पोलीस तैनात होते. तरुणीने उड्डाणपुलावरून उडी मारल्याचे दिसताच वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाकडून भोसरी पोलिसांना माहिती मिळाली. माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तिला तत्काळ पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.