Bhosari : कडीकोयंडा उचकटून घरात अडीच लाखांची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा उचकटून घरातून सुमारे 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 26) पहाटे शास्त्रीनगर कासारवाडी येथे उघडकीस आली.

_MPC_DIR_MPU_II

भास्कर निलय्या सब्बानी (वय 48, रा. नेरुळ ईस्ट, नवी मुंबई) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भास्कर यांचे घर बुधवारी (दि. 25) रात्री साडेअकरा ते गुरुवारी पहाटे पर्यंत कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातून 2 लाख 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, 5 हजार रुपयांची रोख रक्कम 2 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.