Bhosari: महानगरपालिका उभारणार तीन कोटींचे बहुउद्देशीय सभागृह

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे प्रभाग क्रमांक सात भोसरीमध्ये बहुउद्देशीय सभागृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपये खर्च येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रभाग क्रमांक सात भोसरी येथे करसंकलन कार्यालय आहे. या कार्यालयाच्या इमारतीशेजारी महापालिकेची मोकळी जागा आहे. त्याठिकाणी महापालिकेतर्फे नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने विविध कार्यक्रम, उपक्रमांसाठी बहुउद्देशीय सभागृह उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी महापालिका स्थापत्य ‘इ’ मुख्यालयातर्फे निविदा मागविण्यात आल्या. मूळ 3 कोटी 25 लाख 89 हजार 672  रुपये किंमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरीअल टेस्टिंग चार्जेस वगळून 3 कोटी 23  लाख 28 हजार 3 रुपयांवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार अतुल आरएमसी, हिरेन कन्स्ट्रक्शन आणि पी. एन. नागणे या तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.

त्यामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 5.15 टक्के कमी दराची निविदा मेसर्स अतुल आरएमसी यांनी सादर केली. सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार स्वीकृत दरापेक्षा हा दर 5.93 टक्के कमी आहे. मेसर्स अतुल आर. एम. सी. यांनी हे काम 3 कोटी 6 लाख 66 हजार 111 रुपये अधिक 2 लाख 2 हजार  रॉयल्टी आणि 58  हजार 850 रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस असे एकूण 3 कोटी 9  लाख 24 हजार 780 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे भोसरीमध्ये उभारण्यात येणा-या बहूउद्देशीय सभागृहाचे काम त्यांच्याकडूनच करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी येणा-या खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.